Monsoon Update : पुरेशा पावसाशिवाय पेरणीची घाई करू नका

तालुका कृषी अधिकारी यलपलवाड यांचा सल्ला
Monsoon Update
मान्सून रखडला; पेरणीची घाई नकोpudhari
Published on
Updated on

Don't rush to sow without sufficient rain

श्रीक्षेत्र माहूर : पुढारी वृत्तसेवा हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी एल-निनो चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्यामुळे पावसात मोठा खंड पडू शकतो, पर्यायाने दुबार पेरणीचे संकट उभे शकते. ही बाब लक्षात घेऊन माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत अर्थात 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आत्माराम यलपलवाड यांनी केले आहे.

Monsoon Update
Agriculture News Latur : शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत

मृगनक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला आहे, तरी माहूर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली नाही. त्यातच उन्हाची तीव्रता जशाला तशीच कायम आहे. अशा परिस्थितीत अपुऱ्या पावसाच्या जोरावर पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण होणार नाही.

Monsoon Update
Crop Insurance News : किनवट, कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या शिफारशी व कृषी विभागाच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसारच पेरणीचे नियोजन करावे, असा बहुमोल सल्ला तालुका कृषी अधिकारी यलपलवाड यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news