नांदेड : ४ कोटी ४७ लाखांची ठेवीदारांची फसवणूक

बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल
Nanded fraud case
फसवणूक
Published on
Updated on

उमरखेड : उमरखेड येथे दिड वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को -ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड परळीने ग्राहकांना ठेवी रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून ४ कोटी ४७ लाख ७४ हजार रुपयाने फसवणूक केल्याने तक्रारकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संचालक मंडळाच्या १५ जणांवर गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे .

Nanded fraud case
Jiva Pandu Gavit | मानधन तत्वावर नियुक्ती ही तर फसवणूक

उमरखेडमधील लघु व्यवसायिक गणेश लक्ष्मण शिंदे यांनी मागील वर्षी मे २०२३ मध्ये राजस्थानी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लि. शाखा उमरखेडचे शाखाधिकारी विजय खंदारे व राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे चे कर्मचारी छापील पत्रक घेऊन श्रीराम वर्क शॉप ढाणकी रोड उमरखेड या दुकानावर आले. त्या छापील पत्रकावर असल्याप्रमाणे शिंदे यांना डिपॉझीटवर जास्त व्याजदराचे आमिष दाखवून त्यांच्या उमरखेड शाखेत मला पैसे भरण्याचा आग्रह केला. त्यांनी त्यांच्या बँकेत भरलेल्या पैशावर 85 टक्के पर्यंत कर्ज देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी उमरखेड शाखेत खाते उघडून त्यांच्याकडून एकूण पंचवीस लाख सतरा हजार एकशे पंच्यान्नव रूपये रक्कम एक वर्षासाठी राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. उमरखेड शाखा येथे एफडी केली. एफडी मॅचुयर झाल्यावर ते पैसे काढण्यासाठी राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. उमरखेड शाखा येथे गेले असता हेड ब्रान्च ऑफीस मधून पैसे मिळत नसल्याने आंम्ही पैसे देऊ शकत नाही, तुम्ही तुमचे पैसे सेविंग खात्यात ट्रान्फर करा म्हणजे ते पैसे कधीही काढता येतील, असे शाखा मॅनेजर विजय खंदारे यांनी सांगितले.

त्यानंतर खंदारे यांनी एफडीचे पैसे एकूण पंचवीस लाख रूपये परस्पर त्यांच्या सेवींग खात्यावर वळते केले. त्यानंतरही शिन्दे यांनी पैसे परत मिळण्यासाठी वारंवार राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. शाखा उमरखेड येथे गेले असता त्यांना हेड ऑफीस/मेन ब्रांच मधुन पैसे परत मिळत नाहीत, असे कारण सांगून त्यांचे पैसे परत केले नाहीत. त्यांच्या प्रमाणेच उमरखेड तालुक्यातील व परिसरातील अनेक खातेदारांचीही एकूण ४ कोटी ४७ हजाराची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी संचालक मंडळातील १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded fraud case
Bogus SIM Card Fraud | बोगस सीम काढून सहा लाख 76 हजारांची फसवणूक

1) अध्यक्ष चंदुलाल मोहनला बियाणी, 2) उपाध्यक्ष बालचंद्र लोढा, 3) सचिव बद्रीनारायण बाहेती, 4) सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, 5) कोषाध्यक्ष विजय लड्डा, 6) संचालक अशोक जाजू, जाजू, 7) संचालक सतीश सारडा, 8) संचालक अजय पुजारी, 9) संचालिका सौ. प्रेम लता बाहेती, 10) संचालिका सौ. कल्पना बियाणी, 11) संचालक नामदेवारा रोडे, 12) संचालक जगदीश बियाणे, 13) मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, 14) उमरखेड शाखा मॅनेजर विजय खंदारे, 15) उमरखेड शाखा कॅशियर भक्ती सतिष डागा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १५ जणांची नावे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news