Buddhist ceremony Degav
नायगाव ः तालुक्यातील देगाव येथील तक्षशिला बुद्धविहारात भव्य अशा बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.pudhari photo

Buddhist ceremony Degav : देगावात ‌‘बुद्धं शरणं गच्छामि‌’चा जयघोष

तक्षशिला बुध्दविहारात बुद्ध मूर्तीची थाटात स्थापना
Published on

नायगाव : तथागत गौतम बुद्धांच्या करुणा, मैत्री व समतेच्या संदेशाने देगाव नगरी रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी अक्षरशः बुद्धमय झाली. देगाव येथील तक्षशिला बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. “बुद्धं शरणं गच्छामि” च्या जयघोषात संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला.या ऐतिहासिक सोहळ्यास भन्ते संघपाल थेरो यांच्यासह सात भिक्षूंच्या संघाची प्रमुख उपस्थिती लाभली.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांची ही जन्मभूमी असल्याने देगावला चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते.सकाळी धम्म ध्वजारोहणानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपासक-उपासिका पंचशील ध्वज हातात घेऊन, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर विधीवत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Buddhist ceremony Degav
Kinwat Farmers Bhavan : किनवटमध्ये दीड कोटीच्या शेतकरी भवनास मान्यता

यानंतर बुद्ध वंदना व धम्म प्रवचन झाले. भन्ते संघपाल यांनी धम्माचा संदेश देत समाजात शांती, बंधुता व समतेचे महत्व विशद केले. याप्रसंगी लक्ष्मीबाई माधव गायकवाड यांच्या वतीने खीरदान करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी संभाजी मोरे, माऊली मोरे, रणजित मोरे, चिंचलवाड, रावसाहेब मोरे, अशोक गायकवाड, राहुल गायकवाड, राहुल महिपाळे, कोंडावार सर, इमाम शेख, शेषेराव रोडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Buddhist ceremony Degav
Partur traders long march : शहरात निघाला व्यापाऱ्यांचा लाँग मार्च

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माधव गायकवाड, संभाजी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, यशवंत गायकवाड, पिंटू गायकवाड, आनंदा गायकवाड, विठ्ठल गायकवाड, मारोती सांगडे, प्रकाश पवार, झुमके, अविनाश गायकवाड, मिलिंद गायकवाड, बाबू गायकवाड, प्रभाकर गायकवाड, बबलू गायकवाड, वंदना वाघमारे, भाग्यरत्न गायकवाड, चंदरबाई गायकवाड, चौथरबाई गायकवाड यांनी परिश्रम घेतले.विशेष म्हणजे, सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी या सोहळ्यास सहकार्य करून सामाजिक सलोखा व एकतेचे दर्शन घडविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news