

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रा. रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला आहे. चव्हाण यांचे वडील वसंतराव चव्हाण हे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. परंतु त्यांच्या निधनामुळे लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात ही जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे.