Lok sabha Election 2024 Results : नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण यांना निर्णायक आघाडी

Lok sabha Election 2024 Results : नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण यांना निर्णायक आघाडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि.४) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या पहिल्या कलानुसार काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेडमधील काँग्रेस संपेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, चव्हाण यांनी आघाडी घेतल्याने नांदेड जिल्हा अद्यापही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित होत आहे.

नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर पिछाडीवर आहेत. तर वंचितचे अविनाश बोसीकर तीन नंबरवर गेले आहेत.

कोण आहेत वसंत चव्हाण?

नांदेड लोकसभा मतदारसंघातून दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांचे पुत्र वसंत चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. नायगाव विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती.

१९७८ मध्ये ते नायगावचे सरपंच होते. १९९० ते २००२ पर्यंत ते जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून येत होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. २००२ मध्ये ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवड गेले होते.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून जिंकली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.

त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन म्हणून काम केले आहे. माज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक होते. चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसने नांदेड लोकसभेसाठी वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरविले. नायगाव, मुखेड, देगलूरमध्ये त्यांचे वर्चस्व आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news