

Congress faces setback in Naigaon taluka: Manoj Taklikar joins BJP
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : वरबडा व परिसरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नायगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात नवी शक्ती निर्माण केली आहे.
नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे झालेल्या प्रवेश सोहळ्याला खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार राजेश पवार यांच्यासह आमदार राजेश पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस पूनमताई पवार, प्रा. मनोहर पवार, बापूसाहेब पाटील कोडगावकर, बालाजीराव मदेवाड, श्रीहरी देशमुख, लक्ष्मण हासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नायगाव तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने कार्यरत राहणार आहे. पक्षाचे नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणी पाहूनच मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे मनोज टाकळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नरसित लवकरच महामेळावा होणार असून, त्यात हजारो समर्थक भाजपात प्रवेश करतील असेही स्पष्टीकरण मनोज टाकळीकर यांनी केले आहे.