Congress Rally Nanded | शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या: हिमायतनगरमध्ये काँग्रेसची दुचाकी रॅली

शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत म्हणजे थट्टा; सरकारला लाज वाटली पाहिजे’ – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर
Congress Bike Rally
Congress Bike RallyPudhari
Published on: 
Updated on: 

Farmers Financial Aid

हिमायतनगर : कोरड्या दुष्काळामुळे होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याची केलेली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करणाऱ्या सरकारने मंत्र्यांच्या दिवाळीच्या खर्चाचाही विचार करावा, अशा शब्दांत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हिमायतनगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच पीकविम्याची शंभर टक्के भरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली सोनारी फाटा येथून सुरू झालेली ही रॅली हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीनंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले.

Congress Bike Rally
Nanded Women Farmers Registration : महिला शेतकरी नोंदणीत किनवट जिल्ह्यात अव्वल

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत नको!

हिमायतनगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, हळद यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन कमी पडत असताना सरकारकडून केवळ मदतीच्या घोषणा केल्या जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, पीक नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविम्याची शंभर टक्के भरपाई मिळावी, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करून दुष्काळग्रस्त भागात पुरेशा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक

देशात सुरू असलेल्या कथित मतचोरीच्या मुद्द्यावर कारवाई करावी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. दिवाळीपूर्वी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत वाढवून द्यावी, कोरड्या दुष्काळामुळे रोजगाराच्या संकटात सापडलेल्या मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जहप्त्यांना स्थगिती द्यावी, अशा मागण्यांचाही समावेश होता.

Congress Bike Rally
Nanded | प्रकरण न्यायप्रविष्ठ; तरीही व्यापारी संकुलातील भाडेकरूंना मनपाच्या नोटिसा

या मोटार सायकल रॅली मध्ये तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्दन ताडेवाड, माजी सभापती डॉ प्रकाश वानखेडे, संचालक परमेश्वर गोपतवाड, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, शहराध्यक्ष संजय माने,दिलीप इंगळे, सुभाष शिंदे,नितेश जैस्वाल, श्रीदत्त पाटील, बाळू पाटील सुर्यवंशी,गणेश देवराये,पापा पार्डीकर,खालीद भाई,संतोष आंबेकर, संजय पाटील,प्रदिप जाधव,कानबा पोपलवार , पांडुरंग गाडगे ,मनानभाई, राजू पाटील, अंकुश मोरे,

यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि मजूरवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.