Nanded Crime News : गंभीर गुन्ह्याची अवघ्या दोन तासांत उकल सिडको पोलिसांची कामगिरी; दोन लाखांचा ऐवज जप्त

नांदेड शहरातल्या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरींच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
Two Bengal monitor  seized in Kakandi area np88
Nanded Crime News | काकांडी परिसरात दोन घोरपडी जप्त File Photo
Published on
Updated on

CIDCO Police solves serious crime in just two hours

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

शहर व परिसरात चोरी व घरफोडी या सारख्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली असताना सिडको पोलिसांनी आज धडक कारवाई करत अवघ्या दोन तासांत एका गंभीर गुन्ह्याची उकल करताना दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

Two Bengal monitor  seized in Kakandi area np88
Nanded News : शंभर टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याची आशा धूसर

नांदेड शहरातल्या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरींच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः मंगळसूत्र हिसकावणे, वृद्धांना लुटणे या सारख्या घटनांनी डोके वर काढले असून पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेही सोयरसूतक दिसून येत नाही. अन्य कामात रुची दाखवणाऱ्या पोलिसांनी चोरींच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याने चोरट्यांचे मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दूध डोअरीसमोर असलेले शेख मौला शेख मोहंमद (वय ४७) हे आपल्या आजारी मुलीला घेऊन संपूर्ण कुटुंबीयांसमवेत अपेक्षा हॉस्पिटलला होते.

घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दागिने व काही रक्कम लंपास केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. तिथे रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण यांनी तांत्रिक बाबी तपासत आपले कौशल्य पणाला लावले.

Two Bengal monitor  seized in Kakandi area np88
Nanded News : मृगाने निराश केले, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

याच भागात असणाऱ्या सय्यद मोहंमद सय्यद इस्माईल (वय ३१) या ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला तब्बल दोन लाखांचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.

सिडको कामगिरीचे पोलिसांच्या या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. आरोपीला न्यायालयाने कोठडी सुनावली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अन्य एका घटनेत सिडको पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक करून दोन तलवारी व एक खंजर जप्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news