नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. ही पोटनिवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी लढवावी, अशी मागणी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. चैतन्यबापू देशमुख यांनी केली आहे.
माजी खासदार चिखलीकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नकार दिला तर येणाऱ्या लोकसभेच्या पोट निवडणूक पक्षाने माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पोट निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. चैतन्यबापू देशमुख यांनी केली आहे.
माजी खा. चिखलीकर यांनी गुरुवारी साई सुभाष संपर्क कार्यालयात घेतलेल्या बैठकीला महानगरध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, डॉ. सचिन उमरेकर, जनार्दन ठाकूर, प्रवीण साले, मोतीराम पाटील, दीपकसिंह राऊत, संतोष वर्मा व अन्य पदधिकारी उपस्थित होते.
अॅड. चैतन्यबापू देशमुख म्हणाले की, लोकसभा पोटनिवडणूक पक्षासाठी महत्वाची आहे. त्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण आणि माजी खा. चिखलीकर हे दोन नेतृत्व सक्षम आहेत. माजी खासदार चिखलीर यांची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा नसेल तर त्यांनी लोहा-कंधार विधानसभा न लढविता नांदेड दक्षिणमधूनच लढावे आणि लोकसभा पोटनिवडणूक खा. अशोक चव्हाण यांनी लढवावी, यावर बैठकीत एकमत झाले.