Nanded DCC Bank | नांदेड जिल्हा सहकारी बँक : दोन्ही पदांचे उमेदवार; खा. चव्हाणच ठरविणार!

खा.चव्हाण यांना बँकेच्या कारभारात गतिमानता, व्यवसायवृद्धी, विश्वासार्ह्यता, पारदर्शकता इत्यादी प्रमुख बाबींसह बँकेच्या कामकाजासाठी भरपूर वेळ देणारा अध्यक्ष अपेक्षित
Nanded District Bank
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेडः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी प्राथमिक चाचपणी शुक्रवारी रात्री पूर्ण झाली. भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी प्रत्येक संचालकाचे म्हणणे जाणून घेतले. दोन्ही पदांचे उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार चव्हाण यांच्या हाती एकवटले आहेत.

खा.चव्हाण तीन दिवसांपूर्वीच शहरामध्ये दाखल झाले. या दरम्यान इतर काही विषयांत लक्ष घातल्यानंतर बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी होणार्‍या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी सायंकाळनंतर ‘शंकरस्मृती’ इमारतीत नवनिर्वाचित संचालकांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी आ.चिखलीकर यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रत्येक संचालकाचे म्हणणे त्यांनी जाणून घेतले आहे. शुक्रवारची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किशोर स्वामी पुरस्कृत एका ढाब्यावरच्या भोजनाने समारोप झाला.

Nanded District Bank
Dharur traditional artisans : ‘धार’ लावण्याची कला उचलतेय संसाराचा भार

बँकेमध्ये चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचे २१ उमेदवार निवडून आले आहेत. त्यात भाजपाशी संबंधित १४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन संचालक आहेत. या दोन्ही पक्षांनी उपाध्यक्षपदाची मागणी केल्यामुळे अध्यक्षपद परभणी-जालना बँकेपाठोपाठ नांदेडमध्येही भाजपाकडेच जाणार, ही बाब आतापर्यंतच्या घडामोडींतून स्पष्ट झाली.

भाजपाच्या संचालकांमध्ये दोन आमदार तसेच एका आमदाराच्या पत्नीचा, एका आमदाराच्या कन्येचा समावेश आहे. त्यांच्यातील डॉ.तुषार राठोड यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर आले आहे. ते परदेशातील अभ्यास दौर्‍यावर गेले असल्यामुळे शुक्रवारच्या बैठकीस हजर नव्हते. त्यांचे नाव मुख्यमंत्र्यांकडून आले असावे, अशी चर्चा भाजपाच्या गोटात होत आहे.

या बँकेत मागील शतकात इतर संचालकांनी श्यामराव कदम आणि बापूराव शिवराम पाटील आष्टीकर यांचे ‘व्याहीराज’ तब्बल ३० वर्षे अनुभवले होते. त्या ज्येष्ठ नेत्यांनंतर या बँकेत यंदाच्या निवडणुकीतून मारोतराव कवळे व माधवराव जवळगावकर यांच्या रूपाने नवे ‘व्याहीराज’ अवतरले आहे. अध्यक्षपदासाठी कवळे यांचेही नाव आघाडीवर असून त्यांना संधी देण्याचा आग्रह त्यांचे व्याही जवळगावकर यांनी धरला आहे, असे समजते.

खा.चव्हाण यांना बँकेच्या कारभारात गतिमानता, व्यवसायवृद्धी, विश्वासार्ह्यता, पारदर्शकता इत्यादी प्रमुख बाबींसह बँकेच्या कामकाजासाठी भरपूर वेळ देणारा अध्यक्ष अपेक्षित आहे. या कसोटीवर जो उतरेल त्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल, असे सांगितले जात असताना बँकेच्या अध्यक्षपदापासून वंचित राहिलेल्या आपल्या भोकर मतदारसंघातील संचालकांपैकी एखाद्यास चव्हाण प्राधान्य देणार का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागातून बी.आर.कदम यांचेही नाव विचाराधीन आहे, एवढीच माहिती समोर आली.

Nanded District Bank
Bhokardan Accident : बारा तासांच्या प्रयत्नानंतर अखेर क्रेटा कार विहिरीतून बाहेर

मागील पाच वर्षांत बँकेच्या अध्यक्षपदाची अडीच-अडीच वर्षे अशी वाटणी झाली होती. त्यातून वसंतराव चव्हाण आणि भास्करराव खतगावकर या दिग्गजांना अध्यक्षपद भूषविता आले. वसंतराव चव्हाण दोन वर्षांपूर्वीच निवर्तले, तर खतगावकर आता निवृत्त झाले आहेत. पुढील पाच वर्षांत अध्यक्षपदाची वाटणी किती जणात होणार, ते अद्याप जाहीर झाले नाही; पण प्रत्येकास अडीच वर्षांचा कालावधी दिला तर दोघांनाही चांगले काम करण्याची संधी मिळू शकते, असे एका ज्येष्ठ संचालकाचे म्हणणे आहे.

उपाध्यक्षपद मित्रपक्षाकडे?

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपाच्या तीन संचालकांतून एकाकडे सोपविले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मित्रपक्षांपैकी काँग्रेसकडे उपाध्यक्षपदासाठी सुशीलाबाई पाटील बेटमोगरेकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचा पर्याय आहे. शुक्रवारच्या बैठकीस डॉ.मीनल पाटील उपस्थित नव्हत्या; पण नांदेडमध्ये आल्यानंतर खा.चव्हाण यांनी मुंबईत उपचार घेत असलेले ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्याशी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाबाबत चर्चा केली.

बेटमोगरेकरांचे प्रयत्न सुरू!

माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना मागील काळात जेमतेम आठ महिने उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. आता त्यांच्या सौभाग्यवती बँकेवर निवडून आल्या आहेत. उपाध्यक्षपदी त्यांना प्रथम संधी मिळाली पाहिजे, यासाठी बेटमोगरेकर यांनी प्रयत्न सुरू केले असून खा.अशोक चव्हाण यांची त्यांनी दोन दिवसांपूर्वीच भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे खासदारही सुशीलाबाईंसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

logo
Pudhari News
pudhari.news