Nanded News : वडगावमधील आरोग्य वर्धिनी केंद्र सतत बंद

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, प्रशासनाकडून दुर्लक्ष !
Nanded News
Nanded News : वडगावमधील आरोग्य वर्धिनी केंद्र सतत बंद File Photo
Published on
Updated on

Arogya Vardhini Center in Vadgaon remains closed

बाऱ्हाळी, पुढारी वृत्तसेवा: वडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे बंद राहत असून, नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्य हक्काचा बडगा वाजवणाऱ्या शासनाच्या दाव्यांना हरताळ फासला गेला आहे. गावातील लोकांना किरकोळ आजारासाठीसुद्धा दवाखान्यात सेवा मिळत नसल्याने त्रस्त व्हावे लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी घुडुसाब महेबुबसाब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News
Nanded Crime : गडगा शिवारात दसऱ्याच्या दिवशीच खून

केंद्रावर गेले की फक्त कुलूपच दिसते, असे वास्तव आहे. काही वेळा कुलूप उघडे असले तरी तिथे कोणी कर्मचारी नसतो. कधी फक्त परिचारिका असते, प्रभागात कुणालाही ताप, सर्दी, दवाखान्याचे इंजेक्शन, लस किंवा तपासणी करायची झाली तरी त्यांना जवळच्या शहरात जावे लागते, जे अनेक गरीब कुटुंबांसाठी परवडणारे नाही.

महिलांसह लहान मुलांवर अन्याय

या केंद्रावर गर्भवती महिलांसाठी तपासण्या, लसीकरण, रक्तदाब तपासणी, औषधे यासाठी सुविधा उपलब्ध असाव्यात. परंतु प्रत्यक्षात काहीच सेवा मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचीही स्थिती फारच बिकट असून, वारंवार चकरा मारूनही त्यांना उपचार मिळत नाहीत.

Nanded News
Nanded News | अवघ्या सहा तासांत गोदावरीचा पूर ओसरला अन् दुर्गा मातेच्या मूर्ती उघड्या पडल्या

स्थानिकांनी आता संयम सोडायला सुरुवात केली आहे. "जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू," असा इशारा घुडुसाब महेबुबसाब यांनी दिला आहे.

ठोस पावले नाहीत ग्रामस्थांनी याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. काही ग्रामस्थांनी सांगितले की, "तक्रारी केल्यावर काही दिवस केंद्र उघडते, पण पुन्हा तेच स्थिती होते." यावरून हे स्पष्ट होते की केवळ तात्पुरता उपाय केला जातो. पण कायमस्वरूपी व्यवस्था सुध-ारण्यासाठी कुठलीही ठोस कृती होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news