Nanded Crime : जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

नऊ जणांवर गुन्हा; १.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड: नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावंतमाळी नगर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर 'तिर्रट' जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ०९ इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १ लाख ४१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्धापूर पोलिसांना सावंतमाळी नगरमधील मोकळ्या जागेत काहीजण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ छापा टाकला.

Crime News
Nanded Weather : दिवाळी तोंडावर, तरीही गुलाबी थंडीचा नाही आनंद

​या कारवाईत राजरत्न केरबा सोनटक्के, श्रीरत्न सुभाष वाघमारे आणि गौतम गंगाराम प्रधान (सर्व रा. सावतामाळी नगर, अर्धापूर) हे तीन आरोपी घटनास्थळी सापडले. तर संतोष सरोदे, संतोष गायकवाड, बालाजी कांबळे, शुभम सरोदे, अक्षय इंगोळे आणि प्रफुल गोडबोले हे ६ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोटारसायकल, रोख ११५० रुपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १,४१,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या प्रकरणी नऊ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात असे अवैध प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Crime News
Latur Gambling Raid : लातुरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची कारवाई; ११ जणांवर गुन्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.