Lumpy outbreak : लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'पशुसंवर्धन' ॲक्शन मोडवर

मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे आदेश
Lumpy Disease
Lumpy outbreak : लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'पशुसंवर्धन' ॲक्शन मोडवरFile Photo
Published on
Updated on

'Animal Husbandry' in action mode to prevent Lumpy outbreak

नांदेड : पुढारी वृत्तसेवा राज्यातील गायवर्ग पशुधनाला घातक लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित -- ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. सन २०२६-२७- या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या 5 गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन न 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' येथे सुरू झाले असून, 5 पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ही लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Lumpy Disease
Renapur livestock vaccination : रेणापूर तालुक्यात पशुधन संरक्षणासाठी व्यापक लसीकरण

राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन या लसमात्रांचे वाटप केले जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' या संस्थेने आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीपणे केले आहे.

या पार्श्वभूमीवर, लस क्षेत्रीय स्तरावर वेळेत पोहोचवताना तिची 'शीत साखळी' कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशुंचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण यांनी सर्व जिल्हा उपआयुक्तांना दिल्या आहेत. तसेच लसीकरणाचा बिनचूक दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

'हॉटस्पॉट' तालुक्यांमध्ये 'हाय अलर्ट'

गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागांत प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे.

Lumpy Disease
Livestock Farmers : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी
"लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा शेतकरी बांधवांचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. सध्या ही मोहीम आम्ही क्षेत्रीय स्तरावर अत्यंत वेगाने राबवत आहोत, पशुपालकांनीही या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे."
- डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news