Ajit Pawar death : केशरी पगडी, एक हाक आणि न संपणारी आठवण !

अजित पवार यांनी गेल्या रविवारी येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दिली होती भेट
Ajit Pawar death
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारच्या नांदेड दौऱ्यात सचखंड गुरुद्वारात दर्शन घेतले. त्यानंतर बाहेर पडत असताना छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून त्यांच्या भावमुद्रा टिपल्या. (छायाः महेश होकर्णे)
Published on
Updated on

नांदेड ः “हिंद-दी-चादर” शहीदी समागमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या रविवारी येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देत केशरी पगडी परिधान करून दर्शन घेतले होते. गुरुद्वारा बोर्डातर्फे यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुद्वाराच्या सुवर्णमय वास्तूतून, श्रद्धेच्या शांत पावलांनी बाहेर पडताना अजितदादांचा तो क्षण छायाचित्रात कैद करण्यासाठी छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी हाक दिली ‌‘दादा‌’ क्षणभर थांबत, चालत-चालतच त्यांच्या खास शैलीत अजितदादांनी उत्तर दिले, “काय रे, कसा आहेस ? पगडी बरोबर बसली आहे ना”

Ajit Pawar death
Latur ZP Election : जिल्हा परिषदेसाठी 242, पंचायत समितीसाठी 419 उमेदवार मैदानात

तो क्षण केवळ एक छायाचित्र नव्हता, तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवादाचा जीवंत नमुना होता. बुधवारी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर रविवारची ती आठवण होकर्णे यांना अस्वस्थ करून गेली.

Ajit Pawar death
Jalna News : बंडाळीची तक्रार प्रदेशाध्यक्षांच्या दरबारी

केशरी पगडीतील ते चालते पाऊल, तो हसरा प्रश्न आणि छायाचित्रकाराशी झालेला तो अनौपचारिक संवाद आता स्मृतींमध्येच उरला आहे. केशरी पगडीतील ती छबी आज केवळ फ्रेममध्ये नाही, तर प्रत्येक संवेदनशील छायाचित्रकाराच्या मनात कोरली गेली आहे. होकर्णे बंधूंनी या उमद्या नेत्याची काही छायाचित्रे जारी करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news