

Nanded highway bike car collision
माळाकोळी: अहमदपूर - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर माळाकोळी ते 33 केव्ही केंद्राजवळ दुचाकी व कारचा अपघात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूरकडून नांदेड कडे जाणारी दुचाकी (एम एच 24 बी टी0342) व कार (एम एच बारा पी झेड 3774) या दोन वाहनाच्या अपघातात दुचाकीवरील महिला प्रवासी प्रियंका हनमंत निडूरे (वय 30, रा. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य प्रवासी मनोज विठ्ठल पल्ले (रा. लातूर) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.