

A young man was killed in Bhokar, while a family was assaulted by entering a house in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. भोकर येथे एका २१ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे, तर नांदेड येथील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबावर चाकू व विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
भोकरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल
भोकर शहरातील अशोक कॉलनी भागातील रहिवासी लक्ष्मण गंगाधर जिंके (वय २१) या तरुणाचा अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. १ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुधा नदीच्या काठावर लक्ष्मण याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, नुकताच पोलिसांना शवविच्छेदन (PM) अहवाल प्राप्त
घरात घुसून चाकूने हल्ला, वाहनांची तोडफोड
दुसऱ्या घटनेत, नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमन कॉलनी परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. १२ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी फिर्यादी मोहमद रेहान अली जर्रार (वय ३६, रा. अमन कॉलनी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, त्यांचेच शेजारी राहणारे आरोपी शेख दस्तगीर शेख महेबुब (वय ३५) आणि शेख शकील शेख महेबुब (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनि. साखरे हे पुढील तपास करत आहेत.