धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ नेटकऱ्यांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या पाच असामाजिक तत्त्वांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे.

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ ,याचा वापर करू नये, अशी आदर्श आचारसंहिता आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने हुडकून काढले आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे.

धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगर अंतर्गत २९५ ( अ )अंतर्गत, मुखेड मध्ये ५०५ ( २ ), अर्धापूर मध्ये ५०५ ( २ ) व ५०६ ( दोन आरोपी ) माहूर ५०५ (२ ) असे दाखल केलेल्या कलमांचा तपशील आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे नाव जाहीर केलेले नाहीत. निवडणुका लागल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तथापि, तरुणांनी निवडणूक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड करू नये. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर एकमेकांची डोकी गरम करण्यापेक्षा व अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

शहरात सण,उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये. तसेच विचलित होऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

थेट संपर्क साधा….

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news