अरुणाचल प्रदेशभध्ये बीआरओच्या गाडी अपघातात आंबुलगा येथील जवान शहीद | पुढारी

अरुणाचल प्रदेशभध्ये बीआरओच्या गाडी अपघातात आंबुलगा येथील जवान शहीद

कंधार; पुढारी वृत्तसेवा : अरुणाचल प्रदेश येथे आज सिमा सडक संघटनच्या गाडीला अपघात झाला असून यात कंधार तालुक्यातील आंबुलगा येथील जवान महेंद्र आंबुलगेकर शहीद झाले. ही बातमी कळताच आंबुलगा गावांसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आंबुलगा येथील महेंद्र बालाजी आंबुलगेकर (२८ वर्ष) हे सहा वर्षांपूर्वी पुणे येथे सिमा सडक संघटन मध्ये

भरती झाले होते.दरम्यान ते अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना आज कर्तव्य बजावत असतांना त्यांची गाडी दरीत कोसळून सात जवान शहीद व १४ जवान गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांचे पार्थिव त्यांची जन्मभूमी आंबुलगा येथे रविवारी येणार असून त्यांना शेवटची सलामी दिली जाईल.त्यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील एक भाऊ,एक बहिण पाच वर्षांचा एक मुलगा तीन वर्षाची एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

Back to top button