

नांदेड : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. पंजाबमधील अमृतसर येथून अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुख्य महिला तस्करासह तिच्या तीन स्थानिक साथीदारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 72.03 ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) व विनाक्रमांकाची अॅक्टिव्हा स्कूटी असा एकूण 4 लाख 70 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चौघांना अटक केली आहे.
अमृतसरची महिला न्यायालय ते हिंगोली गेट बायपासवर थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला व संशयास्पद स्थितीत थांबलेल्या महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले. महिला तस्कर राजविंदर कौर जरनजितसिंग महाल, गुरमुखसिंग ऊर्फ गुरी सेवकसिंग गिल, अमनप्रितसिंग ऊर्फ मनी जगजितसिंग बेदी व जनार्दन ऊर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के यांना अटक केली आहे.