नायगाव तालुका उपनिबंधक अधिकारी १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ ‘एसीबी’च्या जाळ्यात | पुढारी

नायगाव तालुका उपनिबंधक अधिकारी १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ 'एसीबी'च्या जाळ्यात

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुका उपनिबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक दहा हजाराची लाच घेतांना एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज केलेल्या या नायगाव तालुक्यातील या भ्रष्टाचार प्रकरणाची चर्चा सर्वत्र आहे.

रिद्धी हाऊसच्या नुतणीकरण प्रकरणी नायगाव तालुका उपनिबंधक कार्यालयीन अधीक्षक बाबुराव पवार यांनी दहा हजरांची लाच मागितल्याची तक्रार रिद्धी हाउसच्या कर्मचारीसह मालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली. या तक्रारीनंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एस. पवार, श्रीमती स्वप्नाली धुतराज, गंजेद्र जिंरमकरसह त्यांच्या पथकातील अन्य कर्मचारी यांनी सापळा रचून ही कार्यवाही केली. याबाबत ए एस आय. हिंमगीरे यांच्याशी संपर्क साधला असता कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सागंण्यात आले आहे.

Back to top button