नांदेड : साफसफाईवरुन झालेल्या वादात भाडेकरुने इमारतीवरुन ढकलल्याने घरमालकाचा मृत्यू

file photo
file photo

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : इमारतीमधील स्वच्छता करण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने भाडेकरूने घरमालकास पहिल्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना नायगावमध्ये घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

नायगाव शहरातील मध्यवस्ती असलेल्या वसंतनगरमध्ये दगडू आप्पा मलमवार यांची तीन मजली इमारत असून, या इमारतीमध्ये अनेक जण भाड्याने राहतात. याच इमारतीमध्ये राम बालाजी भैरेवाड (रा. बोरगडी ता हिमायतनगर) भाड्याने राहतात. भैरवाड व घरमालक मलमवार यांच्यात शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) साफसफाई ठेवण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे भैरवाड यांना रूम रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याचा राग भैरवाड मनात धरुन मलमवार यांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावरन ढकलून दिले. या घटनेत घरमालक दगडू मलमवार यांचा गंभीर जखमी झाले. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, यावेळी डॉक्टरांनी मलमवार यांना मृत घोषित केले.

गजान मलमवार यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारीनंतर भैरवाड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी घटनास्थळाला भेट दिली. उपनिरीक्षक एस. एस. बाचावार करीत आहेत. पोलिसांनी राम भैरेवाड या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news