नांदेड रुग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी घाटी डॉक्टरांचे पथक रवाना | पुढारी

नांदेड रुग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी घाटी डॉक्टरांचे पथक रवाना

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी घाटीतील डॉक्टरांचे पथक सोमवारी (दि.2) सायंकाळी नांदेडकडे रवाना झाले. या पथकात तीन डॉक्टरांचा समावेश आहे.

ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी (दि. २) नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान २४ जण मृत्युमुखी पडले. गंभीर बाब म्हणजे या रुग्णांमध्ये १२ नवजात शिशुंचाही समावेश आहे. त्यामूळे चिंता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी घाटीतील तीन डॉक्टरांचे पथक सोमवारी नांदेडकडे रवाना झाले आहे. या पथकामध्ये औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन), जनऔषधशास्त्र (पीएसएम) व बालरोगशास्त्र (पीडियाट्रिक्स) या तीन विभागांतील डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button