नांदेड : ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; चार जण जखमी | Nanded Accident

नांदेड : ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; चार जण जखमी | Nanded Accident
Published on
Updated on

शंकरनगर; पुढारी वृत्तसेवा : नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर किनाळा (ता. बिलोली) येथील बस थांब्याजवळ ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी व दोन मुले जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११ जुन) साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

देगलूरकडून नांदेडकडे जाणारा ट्रक (क्र. CG 08 AV 2821) किनाळा बसस्थानकाजवळ आला असता नरसीकडून शंकरनगरकडे येणारी दुचाकी (क्र.MH 26 BU 5188) यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलवरील नायगाव (ता. भोपळा) येथील उपसरपंच रमेश संभाजी बनसोडे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बनसोडे व मुले शिवानी, शिवम हे चौघेजण जखमी झाले. त्यांचा नरसी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. संभाजी बनसोडे यांच्या छातीमध्ये मार लागल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news