नांदेड : अल्‍पवयीन मुलीच्‍या विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

नांदेड : अल्‍पवयीन मुलीच्‍या विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात सदरील शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संशयीत आरोपींस तत्काळ अटक केली आहे.

शिक्षक सय्यद एजाज टेम्बुरनिकर हा  मंगळवारी (दि. २०)अल्पवयीन मुलीचा घरी गेला. मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून अश्लील कृत्य केले. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचताच घटनेचे गंभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षकास तात्काळ अटक केली. शिक्षकी पेशास काळिमा फासणारे कृत्य केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कते यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिकडूनच असे कृत्य घडल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार,आरोपीवर गुन्‍हा दाखल करुन त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणार्‍या पोस्‍ट व्‍हायरल होत असून, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये व अनावश्यक अफवा पसरविना-यांनी देखील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य किंवा पोस्ट करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news