नांदेड : नाना पटोले, धनंजय मुंडे यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन

नांदेड : नाना पटोले, धनंजय मुंडे यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन
Published on
Updated on

माहूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.५) सकाळी १० च्या सुमारास माहूर गडावरील श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक, पूजा व महाआरती केली. शेतकर्‍यांना अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे, असे साकडे श्री रेणुकामाते चरणी पटोले यांनी घातले. संस्थानतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, दूर्गादास भोपी, अरविंद देव, आशिष जोशी यांनी दोघांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे, माजी तालुका अध्यक्ष अनंतराव केशवे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे, तालुका अध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष आनंद तुपदाळे, नगरसेवक विलास भंडारे, निसार कुरेशी, राजु सौंदलकर, आकाश कांबळे, विश्वनाथ कदम, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादीचे जिल्हा बँक संचालक दिनकर दहिफळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती मारोती रेकुलवार, अमजद पठाण, वाईकर पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे, इरफान सय्यद, रणधीर पाटील, अमित येवतीकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news