

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : SSC Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकलाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज (शुक्रवार) निकालाची प्रतीक्षा संपली असून, राज्यमंडळाने आज दुपारी दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला आहे. नऊ विभागातून छत्रपती संभाजीनगर विभाग पाचव्या स्थानावर आहे.
बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड SSC Result परीक्षेत यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ८७ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर त्यापैकी १ लाख ७६ हजार ७४६ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यात १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला असून, नऊ विभागात छत्रपती संभाजीनगर विभागाने पाचवे स्थान मिळविले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचा SSC Result निकाल ९३.२३ टक्के
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल ९३.५८ टक्के
बीड 96.24, परभणी 90.45, जालना 93.25 हिंगोली 88.71, असा निकाल लागला आहे.
हेही वाचा :