Latur Farmer Death | नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले

पेरणीसाठी काढलेले खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल
Nilanga Farmer End Life
सोहेल शेखPudhari
Published on: 
Updated on: 

Nilanga Farmer End Life

निलंगा : खाजगी सावकाराना कर्ज, आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च त्यातच यंदा पडलेल्या भीषण दुष्काळामुळे नापिकीला कंटाळून आंबेगाव (ता. निलंगा) येथील २३ वर्षीय तरुण शेतकरी सोहेल सलीम शेख यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवार (दि ११) दुपारी घडली.

सोहेल शेख यांच्या कुटुंबात एक हेक्टर शेती असून वडील अपंग असल्याने तो स्वतः शेती करत होता. खरीप हंगामात पाऊस पडला नसल्याने शेतातील उभ्या पीक करपून गेले होते. घरची हलाखीची परिस्थिती, पेरणीसाठी काढलेले खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडावे, तसेच पुढील वर्ष कसे काढावे, या विवंचनेत सोहेल शेख यांनी शेतात काम करता करता अचानक दुपारी झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.

Nilanga Farmer End Life
Latur news : 'साहेब, जनावरांना चारा-पाणी नाही; जगायचे कसे ?'

तात्काळ नातेवाईकांनी दोरी तोडून त्याला निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळचा पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून सोमवारी दुपारी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील एक मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news