Water tank sensor installation : जलकुंभावर आता सेन्सर; निलंगा नगरपरिषदेचा निर्णय

पाणीपातळी कळणार, नासाडी थांबणार, सुरक्षा मिळणार
Water tank sensor installation
जलकुंभावर आता सेन्सर; निलंगा नगरपरिषदेचा निर्णयpudhari photo
Published on
Updated on

निलंगा : रात्री-अपरात्री जलकुंभावर चढून पाणी टाकी भरली की नाही, हे पाहणे नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठीण काम आहे. परिणामी, धोकाही असतो. ही वास्तवता जाणून घेऊन पालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जलकुंभावर आता सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरल्यानंतर आपोआप सायरन वाजणार आहे. त्यामुळे पाणीची नासाडी होणार नाही. शिवाय, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जलकुंभावर चढावेही लागणार नाही.

शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, म्हणून छत्रपती शिवाजीनगर भागातील जलकुंभ, आयटीआय, नगर परिषद पाठीमागील जलकुंभाजवळील विद्युत व्यवस्था पूर्ववत सुरू करणे, किल्लारी फिल्टर येथील एलईडी दुरुस्त करणे, कॅमेरे बसवणे, माकणी प्रकल्पावरील विद्युत व्यवस्थित दुरुस्त करण्याबाबत विद्युत अभियंत्यांना पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे यांनी सूचना केल्या आहेत.

Water tank sensor installation
Dharashiv Politics : सत्ता स्थापनेचे नाट्य रंगतदार; आ. तानाजी सावंत यांना धक्का

तसेच शहरातील जलवाहिनी फुटू नये, शहरातील ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, अशा गल्ली, प्रभागांचा सर्व्हे करून लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठीच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवाय, नागरिकांनीही नळाला तोट्या बसून घ्याव्यात आणि पाणी वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Water tank sensor installation
‌POKRA scheme scam : ‘पोकरा‌’ योजनेत तब्बल 65 कोटींच्या घोटाळ्याचा नवा अध्याय

दरम्यान, जलकुंभभरले की नाही, याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना मोबाइलवर नोटिफिकेशनद्वारे मिळू शकणार आहे. दररोज किती पाणी वापरले गेले आणि किती भरले गेले, याची संपूर्ण माहिती असणार आहे. या प्रणालीमुळे जलकुंभ किती टक्के भरले आहे, हे नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयात बसूनही समजणार आहे असल्याचे नरगराध्यक्ष संजयराज हालगरकर, यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news