NEET Exam : नीट परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा

सूचनांचे काटेकोर पालन करा; पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
NEET Exam
NEET Exam : नीट परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा कराfile photo
Published on
Updated on

Verify the facilities at the NEET exam centers

लातूर, पुढारी वृतसेवा : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) २१ जून रोजी होणारी 'नीट यूजी २०२६' परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असून परीक्षा केंद्रांवरील सर्व सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NEET Exam
NEET UG Re Exam Latur : ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षेसाठी लातूर पोलिसांची कडक सुरक्षा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. बास्टेवाड यांनी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन आणि अन्य पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, तहसीलदार राजाभाऊ कदम, आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील २६ परीक्षा केंद्रांवर 'नीट' परीक्षा होणार असून त्यात लातूर शहरातील १९, अहमदपूर, उदगीर व निलंगा येथील प्रत्येकी दोन आणि चाकूर तालुक्यातील चापोली येथील एका केंद्राचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून गैरप्रकार रोखण्यासाठी 'ड्युटी मॅजिस्ट्रेट' व 'स्टेट ऑब्झर्वर' यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर आवश्यक औषधांसह वैद्यकीय पथके तैनात राहणार आहेत.

NEET Exam
Chhatrapati Sambhajinagar News : पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील ६३ पुलांची तपासणी

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडाव्यात तसेच बसस्थानक ते परीक्षा केंद्रांदरम्यान विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

परीक्षा केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल नेण्यास मनाई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दयानंद महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय आणि जयक्रांती महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांची पाहणी करून सुरक्षा आणि सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news