Latur News : मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही शहरात अनधिकृत बॅनर; नगरपंचायतची कारवाई कधी?

नगरपंचायतीचा कर चुकवून आणि विना परवाना मोठमोठे बॅनर लावून शहराच्या विद्रुपीकरणात भर
Latur News
Latur News : मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही शहरात अनधिकृत बॅनर; नगरपंचायतची कारवाई कधी?File Photo
Published on
Updated on

Unauthorized banners in the city; When will the Nagar Panchayat take action?

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मुख्याधिकाऱ्यांनी अनधिकृत बॅनर लावणे बाबतीत कायदेशीर सूचना दिल्या असतानाही त्यांच्या सूचनेचे पालन न करता अनेकांनी शहरात अनधिकृत बॅनर लावल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्या अनधिकृत बॅनर मालकावर नगर पंचायत कारवाई कधी करणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Latur News
Jayakwadi Dam : जायकवाडीच्या भूमिपूजनाचे हिरक महोत्सवी वर्ष !

नगरपंचायत अंतर्गत शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनरसाठी परवानगी घ्यावी लागते व कर भरावा लागतो. जो कोणी हा नियम न पाळता बॅनर लावेल त्यांच्यावर कारवाई केली जाते. तशा कायदेशीर सूचना मुख्याधिकारी यांनी शहरात फलक लावून अनाधिकृत जाहिरात, बॅनर्स अथवा होर्डिंग्ज लावल्यास किंवा लावताना आढळून आल्यास विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल अशा सूचना केल्या असतानाही चाकूर शहरातील मुख्य चौक व दर्शनीय ठिकाणी व्यापारी, सामाजिक संघटना, वाढदिवस साजरा करणारे कार्यक्रम आणि क्लासेस वाल्यांनी आपल्या प्रसिद्धी व जाहिरात करण्यासाठी भले मोठे बॅनर परवानगी व कर भरणा न करता लावून मुख्याधिकारी यांनी दिलेल्या सूचनाचे त्यांनी पालन केले नाही.

त्यांनी नगरपंचायतीचा कर चुकवून आणि विना परवाना मोठमोठे बॅनर लावून शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. मुख्याधिकारी यांच्या नियमाला बाजूला सारुन शहरात अनेकांनी बॅनरबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Latur News
Nanded Political News : शंकरराव चव्हाण व भाजपा नेते बॅनरमध्ये एकत्र !

यापूर्वीही विनापरवाना बॅनरलावल्याप्रकरणी नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उचलला होता. चाकूर शहरातील मस्जिद चौक, सोसायटी चौक, जुने बस स्थानक, वोथी रोड, नवीन बसस्थानक, त्रिमूर्ती चौक, कॉलेज चौक, झरी रोड याठिकाणी विनापरवानगी व कर भरणा न करता बॅनर लावले आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news