

The health of Mother Earth is endangered by the onslaught of pesticides and chemical fertilizers
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : शेती किफायतशीर बनविण्यासाठी पिकांमधील तणांचे व्यवस्थापन किंवा त्याचे नियंत्रण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पिकातील तणांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर पिकांचे उत्पादनात घटते. उत्पादन वाढीसाठी दरवर्षी हजारो लिटर विविध कृषी प्रकारच्या तणनाशकांचा व रासायनिक खतांचा वापर केला जात आहे.
दरवर्षी यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. यांच्या अती वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीतील पाण्याचे स्रोतही खराब होत आहेत. शेती व्यवसायाला मुख्यत्वे मजूर व पशुधनांची गरज असते, मात्र सध्या शेती कामासाठी कल्याण कर्तव्यम् मजूर मिळत नाहीत. विभाग यंत्रांच्या सहाय्यानेच शेती केली जात आहे. पशुधनांची संख्या कमी शासन झाल्याने शेणखताची वानवा निर्माण झाली आहे.
कीटकनाशके व रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ठासळत आहे. जमिनी खारपड व चोपनी होत आहेत. जमिनीतील पिकांना पोषक असलेले सुक्ष्म जिवाणू (बॅक्टेरिया) नष्ट होत आहेत. कीटकनाशके व रासायनिक खतांचा असाच वापर होत राहिला तर कालांतराने जमिनी मृत होऊन त्या कायमच्या नापीक होतील. अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या बाबत शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होण्याची गरज असून शेणखत व इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा लागणार आहे. घातक रसायनामुळे पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत बोअर, विहिरी, साठवण तलाव व नदीच्या पाण्यात विषारी घटक वाढत आहेत. त्यामुळे आरओ प्लांटचे शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
कृषी क्षेत्रात पारंपारीकतेला बगल देऊन आधुनिकतेची जोड दिली जात आहे. हि जरी काळाची गरज असली तरी त्याचे दुष्परिण मात्र सर्वाना भोगावे लागत आहेत. कारखाने व औद्योगिक क्षेत्रपरिसरातील रसायणयुक्त पाण्यामुळेहि शेतजमीनी नापीक होत असल्याचे दिसून येत आहे.
पुर्वी पीकामधील गाजरगवत, तांदुळजा, कुंजरू, दुधी, हजारदाणी, करडु, चिकटा यासरखी रुंद पानांची व हरळी, कुंदा, शिप्पी, लेना, केना, लव्हाळा अशा तांचा नाश करण्यासाठी खुरपणी - कोळपणी केली जायची आता मात्र नवनवीन तंत्रज्ञान व यंत्रांचा वापर केला जात आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व समाधान-कारक (शंभर मीमी) पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, दुबार पेरणी होणार नाही याची काळजी घ्यावी, वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर मर्यादीतच करावा, कारण त्याचे प्रमाण जास्त झाले तर कोवळ्या पिकांना त्यामुळे इजा होऊन पिके वाया जाण्याचा धोका असतो. शक्यतो सेंद्रीय खतांचाच अधिक वापर करावा असा सल्ला तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिला आहे.