Latur News : नशेसाठी औषधांची विक्री; जिल्हा प्रशासन सतर्क

केमिस्ट, ड्रगिस्ट असो.ची बैठक, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करू नका : जिल्हाधिकारी
Sale of drugs for intoxication; District administration alert
नशेसाठी औषधांची विक्री; जिल्हा प्रशासन सतर्कFile Photo
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवाः डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय प्रवर्गीय औषधे अर्थात - शेड्युल्ड ड्रग्जची विक्री केली जाऊ नये. तसेच अशा औषधे विक्रीची माहिती औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे आवश्यक असून लातूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या नियमांचे पालन करावे. प्रवर्गीय औषधांचा वापर व्यसनासाठी केला जाऊ शकत असल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, आपल्या लातूर जिल्ह्यातील युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

Sale of drugs for intoxication; District administration alert
Latur News : धोंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आष्टी-पाटोदा-शिरुरमध्ये राजकीय वादळ

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे- विरोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रमोद काकडे, बळीराम मरेवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

औषधांचा नशेसाठी वापर होणे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व औषधविक्रेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यातील युवा पिढीमधील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Sale of drugs for intoxication; District administration alert
MSRTC News | चापोली येथील आठवीच्या विद्यार्थ्याच्या तक्रारीने परिवहन महामंडळ हादरले; प्रशासनाने घेतली तत्काळ दखल

या मोहिमेत औषध विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रवर्गीय औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न करण्याचा संकल्प करावा, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानांच्या दर्शनी भागात 'से नो टू ड्रग्ज' म्हणजेच 'ड्रग्जला नाही म्हणा' या आशयाचे फलक लावून जनजागृती करावी. आपल्या भावी पिढीला अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केले.

चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई : तांबे

युवकांना व्यसनाधीन बनविण्यासाठी प्रवर्गीय औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे देण्यासाठी कोणीही दबाव टाकत असेल तर विक्रेत्यांनी त्याची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी, तसेच अशी औषधे अनधिकृतपणे विकणाऱ्यांची माहितीही प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news