Onion News : थेट थार वाहनातून विक्रीसाठी कांदा बाजारात

लासूर स्टेशन येथे ३६०० रुपये क्विंटलचा दर
Onion News
Onion News : थेट थार वाहनातून विक्रीसाठी कांदा बाजारातfile photo
Published on
Updated on

Onion market for sale directly from Thar vehicle

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झोडेगाव येथील शेतकरी योगेश पडोळ यांनी चक्क थार वाहनातून कांदा विक्रीसाठी आणल्याने ही अनोखी आवक चर्चेचा विषय ठरली आहे.

Onion News
Latur News : अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमुक्ती योजना; बॅनरवर मात्र त्यांचाच फोटो गायब!

थेट थारमध्ये भरून आणलेला कांदा बाजार समितीच्या आवारात दाखल होताच व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे पडोळ यांच्या कांदा चाळीतील यंदाच्या हंगामातील पहिल्याच मालाला ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अनोखी वाहतूक आणि मिळालेला चांगला भाव यामुळे शेतकऱ्याचा रुबाबही वेगळा अन् कांद्यालाही भाव! अशी चर्चा बाजार समिती परिसरात रंगली.

Onion News
Crime News : जमिनीच्या वादातून भाजयुमो उपाध्यक्षाचा खून

सामान्यतः कांदा ट्रॅक्टर, पिकअप किंवा टेम्पोमधून बाजारात आणला जातो. मात्र, पडोळ यांनी थारमधून कांदा आणल्याने बाजार समितीत या आवकेची चांगलीच चर्चा रंगली. उत्पादनाला मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. पहिल्याच मालाला समाधानकारक दर मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

स्वच्छ, दर्जेदार कांदा आणण्याचे आवाहन

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा स्वच्छ व चांगल्या प्रतीचा करून आणावा, जेणेकरून चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल. पावसाळ्याचे दिवस असल्याने कांदा बाजारात आणताना ताडपत्री सोबत ठेवावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news