Latur Gram Panchayat News |लक्कडजवळगाच्या सरपंचपदी पुन्हा ओबीसी महिलेची लागणार वर्णी

शिवाजी पेठे यांचे सरपंच पद अपात्र
Latur Gram Panchayat News
तहसिल कार्यालयात तहसीलदार गोविंद पेदेवाड, नायब तहसीलदार तानाजी यादव सरपंचपदाची सोडत काढताना Pudhari Photo
Published on
Updated on

Latur Gram Panchayat News

शिरूर अनंतपाळ: तालुक्यातील लक्कडजवळगा येथे अनुसुचित जमातीचा मागासवर्गीय उमेदवार नसल्याने मागासवर्गीय म्हणून ओबीसी वर्गाला सरपंचपद देण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून शिवाजी पेठे यांना सरपंच पदी विराजमान केले. त्यांनी लक्कडजवळगा येथील जलस्वराज्य योजनेत भ्रष्टाचार करुन हडप केलेली वसुल पात्र रक्कम न भरल्यामुळे संबंधितांच्या तक्रारीवरुन जिल्हा अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी सरपंच पद अपात्र घोषीत केले. त्यामुळे अल्पावधीतच सरपंच शिवाजी पेठे यांना पदावरुन पाय उतार व्हावे लागले.

त्यामुळे उर्वरीत कार्यकाळ ४ ते साडे चार वर्षाचा असल्याने एसटीचे आरक्षण जैसे थे झाले. पुन्हा मागासवर्गीय ओबीसी महिला म्हणून सरपंचपदी अर्चना कुंभार यांची वर्णी लागली. त्याच विद्यमान सरपंच आहेत. ओबीसी महिला सरपंच विराजमान असताना जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेनुसार उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयात तहसीलदार गोविंद पेदेवाड, नायब तहसीलदार, तानाजी यादव यांनी लक्कडजवळगा येथे पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण सोडत केले आहे. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा ओबीसी महिलेची सरपंच पदी वर्णी लागणार आहे.

Latur Gram Panchayat News
लातूर : कंटेनर-कारच्या भीषण अपघातात तीन माजी सैनिकांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news