मोटरसायकल-कारच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

अहमदपूर येथील घटना
मोटरसायकल-कारच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
File Photo
Published on
Updated on

अहमदपूर : शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर कार व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी (दि.११) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हडोळी ( बु.) (ता.कंधार जि.नांदेड) येथील पती-पत्नी काही कामानिमित्त अहमदपूर येथे आले होते. आपले काम आटोपून परतीच्या प्रवासाला गावाकडे निघाले असता थोडगा रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्यावर आले असता त्यांच्या मोटारसायकलला लातूरहून नांदेड कडे जाणार्‍या कारची समोरासमोर धडक बसली यात मोटरसायकल वरील सुखाचार्य नारायण गुट्टे (वय-५९) यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांची पत्नी दिनाबाई सुखाचार्य गुट्टे (वय- ५७) या गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी लातुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news