Latur Crime News | उदगीर - नळेगाव रस्त्यावर मध्यरात्री वाहने अडवून चालकांना मारहाण; ७ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

Latur Udgir Nalegaon Road Robbery | उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा
  robbery
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Latur Udgir Nalegaon Road Robbery

उदगीर : उदगीर - नळेगाव मार्गावरील शहरालगत असलेल्या ललित भवन मंगल कार्यालय जवळील कमानी जवळ वाहन अडवून वाहन चालकास मारहाण करुन पैसे हिसकावून घेतले. आणि वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) रात्री साडेसातच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उदगीर - नळेगाव मार्गावरील शहरालगत असलेल्या ललित भवन मंगल कार्यालयाजवळील कमानीजवळ आरोपींनी संगनमत करून यातील फिर्यादीचे वाहन थांबवून चालकास लाथाबुक्याने मारहाण करून खिशातील ६०० रुपये जबरीने काढले व तसेच सदर छोटा हत्ती वाहनाचा दरवाजा तोडून अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर पाठीमागून येणारी कार थांबवून चालकास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी वाहन चालक सिध्दार्थ राजेंद्र घोणसीकर (रा. सोमनाथपूर, ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात नरसिंग धोंडीराम गणेशपुरे (रा.बनशेळकी ता.उदगीर), दिनेश मुकुंद्र कांबळे (रा.गांधीनगर,उदगीर), सोन्या (पूर्ण नाव माहीत नाही), कुणाल सुतार (रा.गांधीनगर उदगीर), आकाश उर्फ वर्धमान मंडे (रा. फुले नगर, उदगीर), रितेश मुकंद्र कांबळे (रा. गांधीनगर), मंगेश डैबतपूरे (रा.तोंडार ता.उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते करीत आहेत.

  robbery
लातूर : उदगीर तालुक्यात वीज कोसळून ४ जनावरे दगावली; ६०० कोंबड्या वादळी वाऱ्यात मृत्युमुखी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news