भाजप उमेदवाराच्या पहिल्या यादीत अभिमन्यू पवार; फटाके फोडून जल्लोष
औसा, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत औसा मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना पुन्हा संधी दिली आहे. पहिल्या यादीत आ. अभिमन्यू पवार यांचे नाव जाहीर होताच मतदारसंघातील औसा येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. ( Abhimanyu Pawar )
शेत तिथे रस्ता अभियान
आ. अभिमन्यू पवार यांना भाजपाने औसा विधानसभा मतदारसंघात २०१९ ला उमेदवारी दिली होती. त्यात ते विजयी झाले होते. त्यांनी मतदारसंघात हजारो कोटींचे विकासकामे करीत बंद असलेला किल्लारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू केला होता. शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत तेराशे किलोमीटर पेक्षा अधिक लावींचे शेतरस्ते तयार केले होते.
औसा मतदारसंघाच्या विकासाचा दुसरा अध्याय
आता पुन्हा त्यांना पक्षाने पुन्हा दिली असून याबद्दल आ अभिमन्यू पवार यांनी पक्षश्रेष्ठींप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपण केलेल्या विकासकामांमुळे जनतेचा आशिर्वाद याही वेळी माझ्या पाठीशी असेल. निवडणुकीनंतर औसा मतदारसंघाच्या विकासाचा दुसरा अध्याय सुरू होईल आणि तो पहिल्या अध्यायापेक्षा अधिक भव्य असेल असा विश्वास मी औसेकर मतदार बंधू भगिनींना देतो, असे म्हटले आहे. ( Abhimanyu Pawar )

