Latur Murder News
घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा खून केलाPudhari File Photo

लातूर : लाटण्याने मारहाण करून गळा आवळून नवऱ्याचा खून

घरगुती कारणावरून वाद विकोपाला; पत्नीवर गुन्हा दाखल
Published on

चाकूर : तालुक्यातील नळेगाव येथे घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मंगळवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीविरोधात बुधवारी (दि.१०) चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार कांबळे (वय ४० वर्षे) खून झालेल्या पतीचे नाव आहे.

Latur Murder News
Pune Crime News| आंतरधर्मीय विवाहाच्या रागामुळे बहिणीच्या पतीचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील राजकुमार कांबळे हे मंगळवारी घरी असताना त्याच्या पत्नीबरोबर त्यांचे घरगुती कारणावरून भांडण झाले. यावेळी रागाच्या भारात पत्नी संगिता हिने राजकुमार यांच्या डोक्यावर व तोंड्यावर पोळपाट मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केला.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी भेट दिली आहे. फिर्यादी संजीव किशन कांबळे यांच्या फिर्यादीवरून संगीता राजकुमार कांबळे यांच्या विरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news