Latur Crime | उदगीर येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासरा व दिराविरुद्ध खुनाचा गुन्हा

उदगीर शहरातील सादरनगर, देगलूर रोड परिसरातील घटनेने खळबळ
 Crime News
Crime News(File Photo)
Published on
Updated on

Udgir Married Woman Death

उदगीर : उदगीर शहरातील सादरनगर, देगलूर रोड परिसरात ३६ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पती, सासरा आणि दिराविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसलीम शफी खुरेशी (वय ३६, रा. सादरनगर, उदगीर) यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील युसुफ गुलामअहमद पठाण (वय ६३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शफी मुसा खुरेशी, सासरा मुसासाब खुरेशी आणि दिर समी मुसा खुरेशी (सर्व रा. सादरनगर, उदगीर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 Crime News
Latur Crime News : चार सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

फिर्यादीनुसार, आरोपी नवीन दुकान सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करत होते. तसेच किरकोळ कारणे आणि संशयाच्या कारणावरून तसलीम यांचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. ३ जुलै रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास तिघांनी संगनमत करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत नेऊन त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव बेंबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news