

उदगीर : उदगीर जवळ असलेल्या तोंडार पाटीजवळ हा शनिवारी सकाळी हा अपघात झाला आसुन यात बसमधील १३ प्रवाशी जखमी झाले आहेत. उदगीर आगाराची बस क्रमांक एमएच २४एयू ८०५६ ही बस सकाळी ७ ला उदगीर आगारातून नांदेडकडे निघाली होती. तोंडार पाटीजवळ उताराला समोरुन वाहन आल्यामूळे बस चालक राजेंद्र मस्के यांनी अचानक ब्रेक दाबले व बस पलटी झाली.
बसच्या काचा फुटल्या. बसमधील १३ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उदगीर येथील सामान्य रूग्णालयात उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आली . शंकर मस्के हळी, शबाना हमीद अबदार, राजेंद्र राजेंद्र शंकर मस्के रा. हाळी, शबाना हमीद आमदार, आमदार रेश्मा वाजिद, आमदार वाजिद फकीर, रा. उदगीर, राजेंद्र मनोहर रा. उदगीर, शहनाज इमरान आमदार रा. उदगीर, बाळासाहेब विठ्ठल पाटील रा.गलगाव, शेख हुसेन ताहेरसाब रा.देवणी, राहुल बाबू भालेराव रा. खुर्दळी अशी त्यांची नावे असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच उदगीर आगार प्रमूख चिन्मय चिटणीस यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व जखमींना उपचारार्थ उदगीर येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. प्रती जखमी 500 रुपयांची आर्थिक मदत जखमीना करण्यात आली.