लातूर : विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Electricity accident: निलंगा तालुक्यातील गुंजरगा जिल्हा परिषद शाळेतील घटना
schoolboy death by electric shock
मृत कृष्णा दत्ता शिंदेpudhari photo
Published on
Updated on

निलंगा : शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनाची तयारी करीत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या लोखंडी खांबाला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील मौजे गुंजरगा येथे सोमवारी ( दि.१० ) सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास स्नेहसंमेलनाची तयारी चालू असताना घडली.

कृष्णा दत्ता शिंदे (वय १२ ) वर्षे रा.गुंजरगा ता.निलंगा जिल्हा लातूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा तो विद्यार्थी होता. या शाळेत आज स्नेहसंमेलन असल्याने शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायंकाळी ०४ वाजेच्या सुमारास बोलावले होते.

कृष्णा शिंदे हाही शाळेत आला. शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनासाठी उभ्या केलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने त्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. तेथील शिक्षकांनी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

मयत कृष्णा शिंदे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे आईवडील शेतीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शिवाय, मयत कृष्णा याची निलंगा येथील शाळेत शिकण्याची इच्छा होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला गावातील शाळेत शिकविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.

या शाळेत मुख्याध्यापक म्हणून पणबोने यांच्यासह अनेक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र हे शिक्षक मुख्यालयी राहात नसून, ते रोज निलंगा येथून ये - जा करतात. शाळेत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून घटना ऐकून धक्काच बसला असून या प्रकरणी दोषींवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी जागृत नागरिकांत जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news