

जळकोट: जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे शिकत असलेली विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे (रा. टाका ता. औसा) हिच्या हत्या प्रकरणाची एस.आय.टी मार्फत चौकशी करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी सकल मातंग समाज, तालुका जळकोट व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महात्मा फुले चौक, जळकोट येथे सोमवारी (दि.१२ जानेवारी) तीव्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेकडो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.
नवोदय विद्यालय प्रशासन, प्राचार्य, शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांचेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा तसेच एस.सी / एस.टी अक्टनुसार गुन्हा दाखल करावा, ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालवून त्वरीत न्याय द्यावा. पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी व 50 लक्ष रुपये आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी. राज्यात मातंग समाजावर वारंवार अन्याय होत असल्यामुळे समाजाला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तहसीलदार, जळकोट यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे झालेल्या हत्येला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा निषेध म्हणून हा रास्ता रोको करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अनेक मान्यवरांनी यावेळी आपल्या तीव भावना व्यक्त केल्या.
पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा यासाठी समाजातील महिलांच्या हस्ते तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, नगरसेवक संग्राम नामवाड, अविनाश तोगरे, विकास वाघमारे, विधिज्ञ राम नामवाड, संतोष बट्टेवाड, आरपीआय (आ ) चे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, प्रा. पंडित सूर्यवंशी, अर्जुन जाधव, मारुती घोटरे, प्रा. माधव वाघमारे, सतीश वाघमारे, मारुती गुंडिले, विभीषण मद्देवाड, नगरसेविका सुरेखा गवळे, विधिज्ञ राणीपद्मावती नामवाड, बालिकाताई घोटरे, सरपंच सुनील नामवाड, रवी गोरखे, सुनील भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
संग्राम कांबळे सिंदगीकर, पंडित नामवाड, भाऊराव कांबळे, युवा नेते सचिन राजेंद्र केंद्रे, मेहताब बेग, हरीश मोरे, शिवाजी करंजीकर, गंगाधर नामवाड, विधिज्ञ संदीप कलवले, राजेश मोतेवाड, रमण आदावळे, प्रा. राम कांबळे, विश्वनाथ चाटे, अनिल ढोबळे, सिद्धार्थ वाघमारे, सचिन गवळे, डॉ. आकाश शिंदे, बबलू तोगरे, नितीन नामवाड, शरद गायकवाड, नवनाथ नामवाड, सुनील नामवाड, कालिदास नामवाड, सुनील कुंडले, तातेराव वाघमारे या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत अनुष्का पाटोळे या इयत्ता 6 वी मधील विद्यार्थिनीच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला व निवेदनातील मागण्यांवर तातडीने अमलबजावणी करावी अशी मागणी केली.