लातूर : भरधाव टँकरच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Latur Accident News |
मयत करण अंकुश सूर्यवंशी.Pudhari File Photo
Published on
Updated on

चाकूर : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गांवर नांदेडहून लातूरकडे जाणाऱ्या भरधाव टँकर आणि मोटार सायकलच्या धडकेत चाकूर बायपास जवळ एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

करण अंकुश सूर्यवंशी (वय २४ रा. सिद्धार्थ नगर, चाकूर) असे मयत युवकाचे नाव आहे. तो मोटार सायकलवरून अलगरवाडी शेताकडे जात असताना नांदेडहून लातूरकडे जाणाऱ्या टँकरने धडक दिली. त्या धडकेत करणचा जागीच मृत्यू झाला. मयतास येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेने चाकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news