Latur News | शिवछत्रपती संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करा

अध्यक्ष डॉ. पाटील यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
Latur News
शिवछत्रपती संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी कराfile photo
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवा : येथील बहुचर्चित शिव छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराची तसेच संस्थेतील बेकायदेशीर कामकाजाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या सदस्या विजया भूदेव पाटील यांनी एका तक्रार अर्जाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

श्रीमती पाटील यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे या प्रकरणाची चौकशी तातडीने करण्याचे लेखी पत्र संस्था अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनीही पोलिस अधीक्षकांना दिले आहे. श्रीमती विजया पाटील यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात असे नमूद केले आहे की, लातूर येथील विस्तारित एमआयडीसी मध्ये शासनाकडून संस्थेस देण्यात आलेल्या जागेवर संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे.

स्कूलसाठी सदरची जागा कमी पडत असल्याने संस्था सदस्यांनी संस्थेचे संचालक महादेव शहाजीराव मुळे यांच्या नावे शासनाने मंजूर केलेला विस्तारित एमआयडीसी मधील प्लॉट क्रमांक एक्स ७ संस्थेने घ्यावा व तिथे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आला. हा प्लॉट संस्थेच्या नावाने हस्तांतरित झालेला नसतानाही प्लॉटवर तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे. या प्लॉटच्या अवास्तव किमतीच्या कारणावरून हा व्यवहार रद्द करण्यात आलेला असतानाही या व्यवहारापोटी महादेव मुळे यांना तीन वेळेस एकूण १ कोटी ९ लाख रुपये देण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news