

Shirur Anantpal Panchayat Samiti employee fraud
शिरूर अनंतपाळ: पंचायत समितीच्या नरेगा विभागातील कर्मचारी सदानंद नरहारे यांच्या खात्यातून अवघ्या काही मिनिटांत तब्बल 1.47 लाखांची रक्कम गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नरहारे यांच्या मोबाईलवर Jio-Hotstar सबस्क्रिप्शनसाठी 299 कपात झाल्याचे दिसले. पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवरून मिळालेल्या तथाकथित ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने अत्यंत विश्वास संपादन करत “पैसे परत आले का ते PhonePe किंवा दुसऱ्या खात्यात तपासा” असे सांगितले. मोबाईलवर वारंवार पिन टाकण्यास भाग पाडत असताना त्यांचा फोन हॅक झाला. काही क्षणांतच तीन वेगवेगळ्या व्यवहारांतून जवळपास 1.48 लाख रक्कम खात्यातून काढली गेली.
मोबाईल हँग झाल्यामुळे नरहारे यांनी सिम काढून ठेवली आणि त्यामुळे उरलेली रक्कम वाचली. नंतर तपासात समोर आलेला ग्राहक सेवा क्रमांक खोटा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर हादरलेले नरहारे यांनी तत्काळ सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस तपासात हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.