Latur News : उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक तपासणी

कागदपत्रांची पडताळणी अन् शुल्क आकारणीची केली चौकशी
Latur News
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक तपासणी
Published on
Updated on

चाकूर : नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांनी बुधवारी (दि.२५) दुपारी ३ च्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट दिली. यादरम्यान त्यांनी कामकाजाची पाहणी केली. या भेटीत कार्यालयातील रजिस्ट्री प्रक्रिया नियमानुसार पार पडते का? याची सखोल चौकशीही त्यांनी केली.

डॉ. लटपटे यांनी काही निवडक दस्तांची तपासणी करून कागदपत्रांची पूर्तता, शुल्क आकारणीची पद्धत तसेच नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत नियमांचे काटेकोर पालन व्हावे, याबाबत त्यांनी प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक व्यंकट डोके यांना स्पष्ट सूचना दिल्या. शासकीय कार्यालयातील प्रत्येक काम हे नियम व कायद्यानुसारच झाले पाहिजे. नागरिकांच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला असल्याची चर्चा कार्यालयीन परिसरात दिवसभर सुरु होती.

या अचानक तपासणीमुळे कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि पारदर्शकतेचा संदेश गेला असून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे दिसून आले. उपविभागीय अधिकारी डॉ मंजुषा लटपटे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्वरित सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात भेट दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे चाकूर तालुक्यात प्रशासनाविषयी विश्वास अधिक वाढत चालल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news