Latur accident news | अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतमजूराचा जागीच मृत्यू

चाकूर लातूर राष्ट्रीय महामार्गावर घडला अपघात
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

चाकूर : राष्ट्रीय महामार्गावरील अहमदपूरहून लातूरकडे जाणाऱ्या चाकूर बायपासपासून 1 किमी अंतररावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून, वाहन चालक फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम गोरे (वय 75, रा. चाकूर) हे एका शेतकऱ्याच्या शेतात शेतमजुरीचे काम करीत होते. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी अहमदपूरहून लातूरकडे वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. धडक इतकी भीषण होती की,त्या धडकेत राम गोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राम गोरे यांच्या पश्चात पत्नी व पाच मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news