

लातूर : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ. बब्रुवान खंदाडे व भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे निलंबन करण्यात आले होते.
ते निलंबन सोमवारी (दि.27) रद्द करण्यात आले असून तशा आशयाचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबई येथे सोमवारी पक्ष कार्यालयात या दोघांनाही सुपूर्द केले आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत खंदाडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती तर गणेश हाके यांनी अहमदपूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मुंबई येथील कार्यक्रमास भाजपाचे लातूर जिल्हा (ग्रामीणचे) अध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर उपस्थित होते.