Police Combing Operation : लातूर पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन

३३ अधिकारी, १४५ पोलिस कर्मचारी सहभागी, ३५ सराईत गुन्हेगारांची कसून तपासणी
Police Combing Operation
Police Combing Operation : लातूर पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन Pudhari
Published on
Updated on

Latur Police Conduct Midnight Combing Operation

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाने १६ ते १७ मे दरम्यान मध्यरात्री अचानक 'ऑलआऊट' व 'कोंबिंग ऑपरेशन' राबविले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

Police Combing Operation
IAS Avinash pathak : तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी!

या कारवाईत जिल्हा पोलीस दलातील ३३ अधिकारी व १४५ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांवर अचानक भेट देऊन त्यांच्या हालचालींची तपासणी करण्यात आली.

त्यांच्या सध्याच्या राहणीमान, व्यवसाय व वर्तनातील बदलांची सखोल चौकशी करण्यात आली. विशेषतः मालमत्ताविषयक गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून त्यांना समज देण्यात आली. या कारवाईत ४ जणांवर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Police Combing Operation
भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई; IAS पाठक अटकेत, काय आहे प्रकरण?

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. तसेच ५ संशयित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहिमेदरम्यान ३५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांना भविष्यात कोणतेही समाजविघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली. याशिवाय ११७ लॉजेस व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली तसेच ३० संवेदनशील ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.

जिल्ह्यात ३३ ठिकाणी नाकाबंदी करून ४२३ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news