

निलंगा :-मागच्या अनेक दिवसांपासून अस्मानी संकटाने परेशान झालेल्या शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी व ताडमुगळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम अज्ञातानी केले आहे.
निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सूमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकर मधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवली. त्यामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 कट्टे सोयाबीन जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंडगावे यांच्या सर्वे नंबर 179 मधील 2 एकरातील सोयाबीन काढून शेतात बनीम लावून ठेवली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सांयकाळी 6 च्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिली.
एकाच रात्रीतून दोन शेतकऱ्यांच्या बनमी पेटवून दिल्याने शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतकऱ्यासमोर उद्भवलेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाईचा फटका शेतकर्याला बसला आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे दोन्ही शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे.
या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळविण्यात आले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या संकटात काही मदत होईल का याची अपेक्षा केली जात आहे.